
Oh God – हे शब्द ऐकले, की डोळ्यासमोर येतो तो टिपिकल भारतीय माणूस… कुडमुडीत चेहरा, गळ्याभोवतीचा मफलर, आणि आपल्या रोजच्या जगण्याच्या गमती-जमती टिपणारा – द कॉमन मॅन!
आणि हाच कॉमन मॅन आता पुण्यात तुम्हाला भेटायला तयार आहे – अगदी खरंच! आर. के. लक्ष्मण म्युझियम मध्ये!डोळ्यावर गोल चष्मा, चेक शर्ट, धोतर व विस्कटलेले दोन भाले केस — हा ‘सामान्य माणूस’ कोणत्याही भाष्यांशिवाय घडामोडींवर गप्प राहूनही कटू सत्य उघड करत राहतो. व्यस्त डेडलाईनमध्ये पार्श्वभूमीतील गर्दी कमी करताना लक्ष्मणांच्या चित्रात अखेरीस हा एकमेव मूक साक्षीदार उरला, आणि तोच त्यांची अमर ख्याती ठरला.
🔥 फायर ड्रिलची सुरुवात आणि कार्टून म्युझियमची कल्पना
त्या दिवशी ऑफिसमध्ये नेहमीसारखा व्यस्त दिवस सुरू होता. मेल्स, मिटिंग्स आणि सगळीकडे धावपळ. अचानक फायर अलार्म वाजला. “फायर ड्रिल आहे, सर्वांनी खाली उतरावं,” अशी घोषणा झाली.
सगळे सहकर्मी इमारतीबाहेर उभे, आणि उन्हात घामाघूम.मी मात्र वेगळ्याच विचारात होतो – “आता अर्धा दिवस मोकळा आहेच, तर थोडं काही वेगळं का करू नये?”
आणि तिथूनच माझा प्रवास सुरू झाला – आर. के. लक्ष्मण म्युझियम, पुणे.
🔍 कोण होते आर. के. लक्ष्मण?
रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण – भारताचे सर्वात लाडके आणि तीव्र निरीक्षणशक्ती असलेले व्यंगचित्रकार! “द टाइम्स ऑफ इंडिया” मध्ये त्यांचे दररोजचे व्यंगचित्र ‘यू सेड इट’ वाचल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नसे. त्यांनी सामान्य माणसाच्या वेदना, हास्य आणि आशा एका चित्रातून उलगडल्या. त्यांचा “कॉमन मॅन” – मफलर घातलेला, मोठ्या चष्म्यातून पाहणारा, बोलत नसला तरी मनातल्या भावना स्पष्ट व्यक्त करणारा – हा भारताच्या जनमानसात कायमचा घर करून राहिला आहे.
२४ ऑक्टोबर १९२१ रोजी मैसूरमध्ये जन्मलेल्या रसिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण हे लेखक आर. के. नारायण यांचे धाकटे बंधू होते. लहानपणीच पंच व स्ट्रॅण्डसारख्या नियतकालिकांतील रेखाचित्रांनी त्यांना भुरळ घातली; शाळेतील फळ्यावर, घराच्या भिंतींवर सतत चित्रे काढत राहणे हा त्यांचा छंद होता. जे.जे. स्कूल ऑफ आर्टने “पुरेशी पात्रता नाही” असा नकार दिल्यानंतरही त्यांनी मैसूर विद्यापीठातून पदवी घेतली आणि फ्रीलान्स व्यंगचित्रकार म्हणून प्रयत्न सुरू ठेवले. लक्ष्मणांच्या व्यंगचित्रांनी नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयींपर्यंत सर्व राजकीय नेतृत्वावर उपरोधिक टीपण्या केल्या, पण कधीही व्यक्तिगत द्वेष न ठेवता “सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवणे” हेच ध्येय मानले. भ्रष्टाचार, जलसंकट, आर्थिक सुधारणा अशा कोणत्याही विषयावर “कॉमन मॅन”ची नि:शब्द कटाक्षाने केलेली टिप्पणी वाचकांच्या ओठांवर हसू आणि मनात सवाल दोन्ही आणत असे
🏛️ म्युझियमचं स्थान
R. K. लक्ष्मण म्युझियम पुण्याच्या बालेवाडी परिसरात लक्ष्मण नगर येथे आहे. पुणे महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे येथे जाण्यासाठी एकही थेट बस नाही. तुम्हाला कॅब करूनच येथे जावे लागेल.
🖼️ म्युझियममध्ये काय खास?
🧍♂️ १. कॉमन मॅनचं स्वागत
प्रवेश करताच तुमची भेट होते – कॉमन मॅनशी!
त्याचा मोठा पुतळा तुम्हाला जणू म्हणतो – “अरे देवा, तू पण जगाला कंटाळून इथे पळून आलास का?”
✍️ २. लक्ष्मण यांचा स्टुडिओ
ते ज्या टेबलवर बसून कार्टून्स तयार करत, तो स्टुडिओ इथे हुबेहूब उभारण्यात आला आहे.
पेन, ब्रश, रंग, चित्रं – सगळं जसंच्या तसं!
मला क्षणभर वाटलं, मीही त्यांच्या जागी बसलोय आणि कॉमन मॅनचं नवीन स्केच तयार करतोय.
📽️ ३. ऑडिओ-विज्युअल अनुभव
इथे एक खास शो आहे, ज्यात त्यांच्या कार्टूनचा प्रवास, मुलाखती, आठवणी, आणि त्यांनी मांडलेल्या सामाजिक विषयांचं सादरीकरण केलं जातं – एकदम सिनेमासारखा अनुभव.
👦 ४. लहान मुलांसाठी कार्टून कोर्नर
इथे मुलांना स्वतःचं कार्टून काढता येतं. त्यांना स्क्रीनवर अॅनिमेशनसारखं बघता येतं – खेळता खेळता शिक्षण!
५. मालगुडी डे च्या गावाचे मॉडल
तुम्हाला इथे मालगुडी डे या TV मालिकेतील गावाची प्रतिकृती बघायाला मिळेल.
📸 तरुणांसाठी खास आकर्षण
आजच्या सोशल मीडियाच्या युगात जर म्युझियम “Instagrammable” नसेल, तर लोक आवर्जून जात नाहीत. पण इथे अनेक ठिकाणी सेल्फीसाठी खास कोपरे आहेत –कॉमन मॅनसोबत फोटो, स्केचिंग सीनसोबत बूमरँग्स, आणि जुन्या कार्टूनचे बॅकड्रॉप्स!
✍️ शेवटी…
आर. के. लक्ष्मण हे केवळ व्यंगचित्रकार नव्हते, ते आपल्या काळाचे दस्तऐवज होते. त्यांनी हास्याच्या फटकार्यात व्यवस्थेवर प्रहार केले, आणि कॉमन मॅन ला भाषाच दिली.
पुण्यातल्या या म्युझियममध्ये फिरताना, तुमचं मन कधी हसवेल, कधी विचारात टाकेल – पण एक गोष्ट नक्की – बोर होणार नाही!
कॉमन मॅनशी गप्पा मारल्यासारखं वाटलं. त्यांच्या डोळ्यातून भारताचं जे प्रतिबिंब दिसतं – ते आजही तितकंच खरं आणि महत्त्वाचं आहे.
“काही वेळा आयुष्यात थांबायला हवं – आणि तेव्हा आर. के. लक्ष्मणसारखा कोणी तुम्हाला दाखवतो की हास्य, विचार आणि चित्र यांचं अफलातून नातं असतं!”
आर के लक्ष्मण यांचे कार्टूनस





Leave a Reply